संवाद ब्लॉग मध्ये आपले स्वागत आहे. Email:drsklawate@gmail.com Call 9881250093

Friday, October 19, 2018


जिल्हास्तरीय प्रगल्भ वाचन स्पर्धा निकाल
      ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सुनीलकुमार लवटे लिखित “वाचन” या पुस्तकावर आधारित घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय प्रगल्भ वाचन स्पर्धेत शालेय गटात एस.एम.लोहिया हायस्कूलचा विदयार्थी शिवदत्त मारुती ‍ मिरजकर प्रथम,  हर्षल संदिप शिंदे (विमला गोयंका विदयालय) द्वितीय, श्रुती नंदकुमार पिसे (आदर्श प्रशाला)  तृतीय क्रमांक, तर उत्तेजनार्थ नेहा संजय जाधव सुसंस्कार हायस्कूल कदमवाडी, प्रियंका राजेंद्र कांबळे (सरस्वती हायस्कूल इचलकरंजी), प्रथमेश उदयसिंग चव्हाण (महाराष्ट्र हायस्कूल कोल्हापूर)
तर  कनिष्ठ महाविदयालयीन गटामध्ये  प्रियदर्शनी शिवाजी सरनोबत (छत्रपती शहाजी महाविदयालय) प्रथम क्रमांक, ओम संजय पाटील (राजाराम महाविदयालय) द्वितीय क्रमांक, अभिषेक संतोष व्यवहारे (डी.आर.माने कॉलेज कागल) तृतीय क्रमांक , तर उतेजणार्थ नम्रता दत्तात्रय रावत (न्यू कॉलेज ), सौरभ संभाजी पाटील (विवेकानंद कॉलेज), संग्राम विलास पाटील (डी.आर.माने कॉलेज कागल), 
     विजेत्या विदयार्थ्याना अनुक्रमे तीन हजार,  दोन हजार,  एक हजार  व उत्तेजनार्थ क्रमांकांना चारशे रुपयांची पुस्तकांच्या रूपात बक्षिसे दिली जातील. या स्पर्धेत तेराशेपेक्षा अधिक विदयार्थ्यांनी परीक्षा दिली. १५ ऑक्टोबर रोजी वाचन प्रेरणा निमित्त ‍वाचनकटटा बहुउदेशीय संस्था व भाग्यश्री प्रकाशन यांच्या वतीने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.वाचन प्रक्रियेची उत्कृष्ठ मांडणी करणारे ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सुनीलकुमार लवटे लिखित “वाचन” या पुस्तकावर आधारित ही स्पर्धा घेतली होती.  
 या स्पर्धेचे मुल्याकन समितीचे प्रमुख विश्वास सुतार व परीक्षा संयोजन समिती प्रमुख आर.वाय. पाटील यांनी निकाल प्रसिध्दीसाठी दिला.

No comments:

Post a Comment