संवाद ब्लॉग मध्ये आपले स्वागत आहे. Email:drsklawate@gmail.com Call 9881250093

Tuesday, November 13, 2018

परिषदेमध्ये महाराष्ट्र बालसाहित्य
मुलांच्या भावविश्वानुसार बालसाहित्यिकांनी आपले लेखन करावे. मुद्रित माध्यमासह दृकश्राव्य माध्यमात बालसाहित्यिकांनी यायला हवे. जगभर या क्षेत्रात काय चालले आहे याचे भान हवे असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सुनीलकुमार लवटे यांनी केले. चैतन्य सृजन सेवा संस्था आजरा, बाल मित्र समूह व मराठी बालकुमार साहित्य सभा कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने एकदिवसीय बालसाहित्य परिषद कोल्हापूर येथील रवळनाथ हाऊसिंग सोसायटीमध्ये संपन्न झाली. कार्यशाळेत बालसाहित्य क्षेत्रातील महत्त्वपूर्ण विषयावर चर्चा करण्यात आली.
  या परिषदेसाठी प्रसिद्ध बालकथा लेखक डॉ.राजीव तांबे, बालकवी किशोर पाठक (नाशिक), प्रशांत गौतम (औरंगाबाद), गोविंद गोडबोले, सावित्री जगदाळे, अरुण देशपांडे, डॉ.श्रीकांत पाटील, चंद्रकांत निकाडे, अशोक पाटील, बाळ पोतदार, प्रकाश क्षीरसागर चंद्रकांत कुलकर्णी, शिवशंकर उपासे, सुनील सुतार. डॉ.म.ग गुरव यांनी बालसाहित्यावर विचार व्यक्त केले. यावेळी शिक्षणविस्तार अधिकारी विश्वास सुतार, परशराम आंबी, नसीमा जमादार, दीप्ती कुलकर्णी, प्रणिता तेली, संजय मगदूम यांच्यासह महाराष्ट्रातील बालसाहित्यीक उपस्थित होते. ज्येष्ठ बालसाहित्यिक तांबे म्हणाले मराठीतील बालसाहित्य इतर भाषांमध्ये पोहोचवण्याची गरज आहे. विशेष गरजा असणाऱ्या बालकांचा विचारही बालसाहित्यिकांनी करावा. सुभाष विभूते यांनी सूत्रसंचालन. सुनील सुतार यांनी आभार मानले.

चौकट-
 परिषदेमध्ये महाराष्ट्र बालसाहित्य परिषदेची स्थापना करण्यात आली. परिषदेच्या अध्यक्षपदी डॉ.राजीव तांबे, उपाध्यक्षपदी डॉ.शिवशकर उपासे, सचिवपदी सुभाष विभूते, खजिनदारपदी चंद्रकांत निकाडे यांची निवड करण्यात आली. यावेळी ज्येष्ठ साहित्यिक डॉ सुनीलकुमार लवटे यांनी महाराष्ट्र बालसाहित्य परिषदेसाठी एक लाखाची देणगी जाहीर केली. बालसाहित्य परिषदेत “आज्जोपिझ्झा” व “टिंबांचा कविता” या दोन पुस्तकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.