संवाद ब्लॉग मध्ये आपले स्वागत आहे. Email:drsklawate@gmail.com Call 9881250093

Sunday, October 14, 2018


वाचन प्रेरणा दिनानिमित्त जिल्हास्तरीय प्रगल्भ वाचन स्पर्धेचे आयोजन

कोल्हापूर:  १५ ऑक्टोबर रोजी वाचन प्रेरणा दिनानिमित्त होणाऱ्या जिल्हास्तरीय प्रगल्भ वाचन स्पर्धेत तेराशेपेक्षा अधिक विदयार्थ्यानी सहभाग नोंदविला आहे. कोल्हापूरमध्ये वाचनाची आवड वृध्दिंगत होण्याच्या दृष्टीने ‍वाचनकटटा बहुउदेशीय संस्था व भाग्यश्री प्रकाशन यांच्या वतीने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. निर्मिती व वितरण अक्षर दालन असून मीडिया पार्टनर रेडिसीटी आहे. शालेय स्तरावर १४ केंद्र व कनिष्ठ महाविदयालयीन स्तरावर ४ केंद्रावर विदयार्थ्यांची बैठक व्यवस्था केली आहे. सोमवार दि. १५ ऑक्टोबर २०१८ रोजी कनिष्ठ महाविदयालयीनसाठी सकाळी १० ते ११.३० तर शालेय गटासाठी १२ ते १.३० या वेळेत परीक्षा केंद्रांवर परीक्षा घेतली जाईल.
     दिवंगत माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या स्मृती जतन करण्याच्या उददेशाने १५ ऑक्टोबर हा त्यांचा  जन्मदिवस “वाचन प्रेरणा दिन” साजरा करण्याचा निर्णय शासनाने तीन वर्षापूर्वी घेतला. याच अनुषंगाने यावर्षी कोल्हापूरमध्ये शालेय आणि महाविदयालयीन तरुणांसाठी “जिल्हास्तरीय प्रगल्भ वाचन स्पर्धा २०१८” चे आयोजन करण्यात आले आहे. 
            वाचन प्रक्रियेची उत्कृष्ठ मांडणी करणारे ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सुनीलकुमार लवटे लिखित “वाचन” या पुस्तकावर आधारित ही स्पर्धा घेतली जात आहे. यामध्ये जिल्हयातील विविध शाळा महाविदयालयातील तेराशेपेक्षा अधिक विदयार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग नोंदविला आहे.  शालेय व कनिष्ठ स्तरांवरील विजेत्यांना अनुक्रमे तीन हजार,  दोन हजार,  एक हजार  व उत्तेजनार्थ क्रमांकांना पाचशे रुपयांची पुस्तकांच्या रूपात बक्षिसे दिली जातील. तसेच प्रत्येक सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्रे दिली जाणार आहेत. बक्षीस समारंभ २० ऑक्टोबर रोजी दुपारी तीन वाजता प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डीग हाऊस सभागृह, न्यू कॉलेज परिसर शिवाजी पेठ येथे संपन्न होणार आहे. यामध्ये प्रमुख पाहुणे ज्येष्ठ साहित्यिक डॉ.चंद्रकुमार नलगे यांच्या हस्ते विदयार्थ्यांना गौरविण्यात येणार आहे.  
     यानुसार शालेय स्तरावर १४ केंद्र व कनिष्ठ महाविदयालयीन स्तरावर ४ केंद्रावर विदयार्थ्यांची बैठक व्यवस्था केली आहे. शालेय स्तरावरील केंद्र पुढील प्रमाणे: महाराष्ट्र हायस्कूल, न्यू हायस्कूल, नुतन मराठी विदयालय, विमला गोएका विदयालय, भाई माधवराव बागल हायस्कूल, पदमराजे गर्ल्स स्कूल, एस.एम.लोहिया हायस्कूल, आदर्श प्रशाला, सुसंस्कार हायस्कूल, दादासाहेब मगदुम हायस्कूल, नवनाथ हायस्कूल पोहाळे, चिंचवाड हायस्कूल चिंचवाड, सरस्वती हायस्कूल इचलकरंजी व आंतरभारती विदयालय इचलकरंजी तसेच कनिष्ठ महाविदयालय स्तरावरील केंद्र पुढील प्रमाणे महावीर कॉलेज, विवेकानंद कॉलेज, न्यू कॉलेज कोल्हापूर, डी.आर.माने कॉलेज कागल, याप्रमाणे विदयार्थ्यांची बैठक व्यवस्था करण्यात आली आहे     प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊस सभागृह शिवाजी पेठ कोल्हापूर येथे संपन्न झालेल्या आढावा बैठकीसाठी ज्येष्ठसाहित्यिक डॉ.सुनीलकुमार लवटे, मूल्यांकन संयोजक शिक्षणाधिकारी विश्वास सुतार, वाचनकटटयाचे युवराज कदम, स्पर्धा संयोजक आर.वाय.पाटील, कार्यक्रम समन्वयक प्राचार्य सी.एम.गायकवाड, परीक्षा संयोजक चंद्रकांत निकाडे, प्रा.विनय पाटील, उत्तम तळवार, प्रा.प्रभाकर हेरवाडे, प्रा.टी.के सरगर, सुनील शिंदे, सुरेश मसुटे, संदीपपाडीकर, संजय पाटील, राजेंद्रकुमार गोंधळी, प्रा.राजेंद्र हिरकुडे, मिलिंद यादव, दिलीप इंगवले, राजेद्र पाटील, बसवराज वस्त्रद, पी.पी.सुतार, संजय कळके, सौ. वैशाली शिंदे आदी उपस्थित होते.


No comments:

Post a Comment