संवाद ब्लॉग मध्ये आपले स्वागत आहे. Email:drsklawate@gmail.com Call 9881250093

Monday, October 22, 2018

जिल्हास्तरीय प्रगल्भ वाचक स्पर्धा पारितोषिक वितरण समारंभ संपन्न


   ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सुनीलकुमार लवटे लिखित वाचनया पुस्तकावर आधारित घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय प्रगल्भ वाचन स्पर्धेतील विजेत्या विदयार्थ्यांना जेष्ठ साहित्यिक रातवाकार डॉ.चंद्रकुमार नलगे यांच्या हस्ते गौरविण्यात आले. शिवाजी पेठेतील न्यू कॉलेज येथे कार्यक्रम संपन्न झाला. १५ ऑक्टोबर रोजी वाचन प्रेरणादिना निमित्त शालेय व महाविदयालयीन गटात ही स्पर्धा घेण्यात आली होती. या स्पर्धेत तेराशेपेक्षा अधिक विदयार्थ्यांनी परीक्षा दिली होती.
     विजेत्या विदयार्थ्याना अनुक्रमे तीन हजार,  दोन हजार,  एक हजार  व उत्तेजनार्थ क्रमांकांना चारशे रुपयांची पुस्तकांच्या रूपात बक्षिसे मान्यवरांच्या हस्ते देण्यात आलीत. स्पर्धेतील विजेते विदयार्थी शालेय गटात शिवदत्त मारुती ‍ मिरजकर (एस.एम.लोहिया हायस्कूल ) प्रथम,  हर्षल संदिप शिंदे (विमला गोयंका विदयालय) द्वितीय, श्रुती नंदकुमार पिसे (आदर्श प्रशाला)  तृतीय क्रमांक, तर उत्तेजनार्थ नेहा संजय जाधव (सुसंस्कार हायस्कूल कदमवाडी), प्रियंका राजेंद्र कांबळे (सरस्वती हायस्कूल इचलकरंजी), प्रथमेश उदयसिंग चव्हाण (महाराष्ट्र हायस्कूल कोल्हापूर)
तर  कनिष्ठ महाविदयालयीन गटामध्ये  प्रियदर्शनी शिवाजी सरनोबत (छत्रपती शहाजी महाविदयालय) प्रथम क्रमांक, ओम संजय पाटील (राजाराम महाविदयालय) द्वितीय क्रमांक, अभिषेक संतोष व्यवहारे (डी.आर.माने कॉलेज कागल) तृतीय क्रमांक , तर उतेजणार्थ नम्रता दत्तात्रय रावत (न्यू कॉलेज ), सौरभ संभाजी पाटील (विवेकानंद कॉलेज), संग्राम विलास पाटील (डी.आर.माने कॉलेज कागल),
     यावेळी डॉ.नलगे म्हणाले  जे पुस्तक वाचकाकडून  मोठया प्रमाणात वाचले जाते त्याचा लेखकाला मोठया प्रमाणात आनंद होतो. आपण वाचन व्यवहाराबददल ‍विचारही करत नाही आणि वाचतही नाही. वाचनांसबंधीत सर्व पैलूवर प्रकाश टाकून प्रगल्भ वाचक घडवणारे हे मराठीतील पहिलेच पुस्तक आहे.
     स्वागत प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंगहाऊसचे सदस्य प्रा.विनय पाटील, प्रास्ताविक प्राचार्य डॉ.सुनीलकुमार लवटे, पाहुणे ओळख प्रा.सी.एम. गायकवाड, अहवाल वाचन शिक्षण विस्तार अधिकारी विश्वास सुतार, सुत्रसंचालन प्रा.डॉ. एस.एच.शेटके व प्रा.जे.बी,दिंडे यांनी केले, पसायदान प्रा.सौ. मनिषा नायकवडी यांनी गायिले तर आभार वाचनकटटा बहुउददेशीय संस्थेचे संस्थापक युवराज कदम यांनी मानले. कार्यक्रमास अनिलभाई मेहता, वाचन पुस्तक प्रकाशक सौ. भाग्यश्री कासोटे, इंद्रजीत कासोटे, अक्षर दालनचे रविद्र जोशी, न्यू एज्यूकेशन संस्थेचे सचिव प्रा.हेरवाडे, शहाजी महाविदयालयाचे प्राचार्य शहानेदिवाण, परीक्षा संयोजक चंद्रकांत ‍ निकाडे, न्यू कॉलेजचे उपप्राचार्य प्रा.टी.के.सरगर, शिक्षक वाचन कटटाचे संजय पाटील, उत्तम तळवार, संजय कळके, परशुराम आंबी यांच्यासह मान्यवर व ‍विदयार्थी उपस्थित होते.
                              कोल्हापूर-दि.21 ऑक्टोबर 2018

No comments:

Post a Comment